आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दत्त मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सप्ताहानिमित्त कार्यक्रम; खामगाव अर्बन बँक परिसरात कर्मचाऱ्यांनी केली दत्त मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

खामगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव कर्मचारी संघटने द्वारा संचालित श्री दत्त उपासक मंडळाची स्थापना सन १९८३ मध्ये तत्कालीन सरव्यवस्थापक स्व. वसंतराव पाटणकर यांच्या मार्गदर्शनात प. पू. पाचलेगांवकर महाराज यांच्या हस्ते बँकेच्या आवारात श्री दत्त भगवान च्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. गेल्या ३८ वर्षांपूर्वीचे मंदिर अगदी लहान स्वरूपाचे होते. श्री दत्त उपासक मंडळाचे संचालक वृंद व बँकेचे संचालक, अधिकारी व कर्मचारी वर्गाने नूतन भव्य स्वरूपाचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वर्षापासून बांधकाम सुरु असून, नुकतेच पूर्णत्वास आले आहे.

मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त ७ ते १३ मेपर्यंत श्री दत्त गुरु सप्ताह करण्यात आला झाला आहे. सप्ताहात गुरु चरित्र पारायण तथा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या सिद्ध दत्त मंत्राचा सव्वा लक्ष सामूहिक जप, श्री सद्गुरु एकनाथ महाराज भजन मंडळ, सती फैल यांचे भजनाचा कार्यक्रम, श्री स्वामी ज्ञान मृत्यानंदजी महाराज, रामकृष्ण मठ, धंतोली, नागपूर यांनी स्वामी विवेकानंदांच्या संकल्पनेतील शिवभाव जीव सेवा या विषयावर मनमोहित करुन टाकणारे प्रवचन, महाराणा प्रताप जयंती प्रीत्यर्थ त्यांचे जीवन चरित्रावर राजेंद्र राजपुत यांचे मार्गर्शन, श्री दत्त देवाची भागवत गीता किरण रेठेकर व कचरू रेठेकर यांचे राहणार आहे.

१३ मे रोजी श्री दत्त गुरु चरीत्र पारायणाची समाप्ती, सामुहिक जपाचे समर्पण, होमहवन, पूर्णाहुती, कलश रोहन, श्री दत्तात्रयांची प्राणप्रतिष्ठा प.पू. जितेंद्रनाथ महाराज, देवनाथ मठ, सुर्जी अंजनगाव मठाधिपती यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून कलश रोहन प.पू.श्री दंडेस्वामी महाराज यांच्या हस्ते होणार आहे. तरी खामगाव शहरातील सर्व भावीक-भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष श्री दत्त उपासक मंडळ तथा खामगाव अर्बन बँक परिवाराने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...