आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायलेकाची आत्महत्या?:जीव गेल्यानंतरही मुलाला घट्ट पकडून होती आई; दोन दिवसांपासून मुलासह होती बेपत्ता, विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

बुलडाणाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बुलडाणा जिल्ह्यातील हतेडी येथील घटना, आत्महत्या केल्याचा अंदाज

येथील हतेडी येथे एका विहिरीमध्ये महिलेसह मुलाचा मृतदेह सापडला आहे. या महिलेने आपल्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ही महिला गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होती. हतेडी तिचे सासर असून तिचे माहेर मेरा बु. असल्याचे सांगितले जात आहे.

विहिरीत मृतदेह पाहिल्यानंतर गावकरी गोळा झाले. यानंतर पोलिसांना कळवून दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाली हरिदास चव्हाण असे या महिलेचे नाव होते. तसेच दोन दिवसांपूर्वी मानसिक तणावातून तिने घर सोडले होते. आता तिचा आणि तिच्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. या मुलाचे नाव समर्थ असून तो 6 वर्षांचा होता. तिने आपल्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी. तरीही या प्रकरणाचा सविस्तर तपास केला जात आहे.

दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले तेव्हा आई मृत्यूनंतरही आपल्या मुलाला घट्ट पकडून होती. मुलासह उडी घेतल्यानंतर मुलाला देखील आपल्यासोबत मारण्यासाठी तिने असे पकडले असावे असा अंदाज आहे.

बातम्या आणखी आहेत...