आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज:स्वाधार योजनेसाठी 10‎ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ‎

बुलडाणा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर‎ स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांनी‎ अर्ज सादर करण्यासाठी १० फेब्रुवारी‎ पर्यंत मुदतवाढ देण्यात आहे.‎ यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी स्वाधार‎ योजनेचे परिपूर्ण अर्ज सादर करावे,‎ असे आवाहन समाज कल्याण‎ सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड‎ यांनी केले आहे.‎ भारतरत्न डॉ. बाबासाहेब‎ आंबेडकर स्वाधार योजनेसाठी पात्र‎ विद्यार्थ्यांचे अर्ज सहायक आयुक्त,‎ समाज कल्याण कार्यालयाच्या‎ बाजूला असलेल्या डॉ. बाबासाहेब‎ आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे‎ शासकीय वसतिगृहात २१ डिसेंबर‎ पासून सकाळी १० ते ४.३० या वेळेत‎ स्वीकारण्यात येत आहे.‎

अनुसूचित जाती तथा नवबौद्ध‎ घटकातील अकरावी, बारावी तसेच‎ बारावी नंतरच्या व्यावसायिक,‎ तसेच बिगर व्यावसायिक‎ अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या‎ विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता‎ यावे. म्हणून भोजन, निवास आणि‎ इतर शैक्षणिक सुविधा या‎ विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन‎ घेण्यासाठी आवश्यक रक्कम‎ विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक‎ खात्यात थेट जमा करण्यासाठी‎ सामाजिक न्याय व विशेष सहाय‎ विभागातर्फे भारतरत्न डॉ.‎ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार‎ योजना सुरु केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...