आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहकाचा मृत्यू:बुलडाणा आगारातील वाहकाचा मृत्यू ; गुजरात राज्यातील व्यारानजीक घडला अपघात

बुलडाणा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील बुलडाणा-सुरत या बसवर गेलेल्या वाहकाचा गुजरात राज्यातील व्यारानजीक अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १३ जून रोजी रात्री घडली आहे. नादुरुस्त बस रस्त्यावर बिनधास्तपणे सोडण्यात येत असून या बसवर गेलेला वाहक “ब्रेक डाऊन”चा बळी ठरल्याची चर्चा एस.टी.कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे. बुलडाणा आगाराची एम.एच. ४० एन ९५८८ या क्रमांकाची बस १३ जून रोजी सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास सुरत करीता रवाना झाली होती. यात चालक श्याम कराळे रा.बुलडाणा तर वाहक प्रमोद माळोदे म्हणून होते. ही बस व्यारा जवळ पोहोचली असता रात्री बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला. मेकॅनिकला बोलावण्यासाठी चालक व वाहक हे दोघे रस्ता ओलांडत असताना अचानक भरधाव वेगात आलेल्या स्विफ्ट कारने वाहक प्रमोद माळोदे यांना जोरदार धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले त्यास व्यारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान काही मिनिटातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी व्यारा पोलिस स्टेशनला स्विफ्ट चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोंगळ कारभारामुळे एस. टी. च्या मेंटेनन्सची कामे होत नाही? मागील काही दिवसापासून बुलडाणा आगारामध्ये भोंगळ कारभारामुळे चर्चेत आहे. येथील अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे बसेसच्या मेंटेनन्सकडे लक्ष दिले जात नाही. बसची थातूरमातूर काम करून नादुरुस्त बसेस बिनधास्तपणे प्रवासी वाहतूक करीत आहेत. अनेक बसेस ब्रेक डाऊन होतात आणि याचा फटका नाहक प्रवाशासह, वाहक, चालकांना बसतो. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांसह एस.टी.वाहक, चालकांनाही आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...