आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात वृत्त:नागपंचमीच्या पूर्वसंध्येला सर्पदंशाने मुलीचा मृत्यू ; परिसरात हळहळ व्यक्त

बुलडाणा10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपंचमीच्या पूर्वसंध्येला सर्पदंशाने मुलीचा मृत्यू झाल्याची घटना जिल्ह्यात समोर आली आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील किनगाव जट्टू येथे झोपेत विषारी साप चावल्याने १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला.किनगाव जट्टू येथील आरती विष्णू वाघमारे वय १२ या मुलीला झोपेत साप चावला. काहीतरी चावल्याचे तिच्या आजीला सांगितले. घरात शोधल्यावर काहीच दिसले नाही. दरम्यान, मुलीचा त्रास वाढत असल्याने तिला रात्रीच तत्काळ बिबी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासून सर्पदंश झाल्याचे निदान केले. प्राथमिक उपचार करून तिला जालना येथील रूग्णालयात हलवण्यात आले. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.