आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारागृहात कैद्याचा मृत्यू:न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्याचा मृत्यू, बुलडाण्यातील धक्कादायक घटना; कुटुंबियांकडून पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप

प्रतिनिधी । बुलडाणा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा येथील जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्याचा 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी मृत्यू झाला. मृतक राजेंद्र सुपडाजी डांगे वय 53, रा. नांदुरा हे माजी नगरसेवक होते. त्यांच्या मृत्यूनंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात भाजप कार्यकर्ते जमा झाले होते. त्यामुळे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.

दरम्यान त्यांच्यासोबत कारागृहात असलेल्या मुलाने कारागृहात वडिलांना छातीत त्रास होत असतानाही दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात न्यायाधीशांनी भेट देऊन चौकशी केली आहे.

राजेंद्र डांगे यांच्यावर नांदुरा पोलिस ठाण्यात जुलै महिन्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल होता. 31 जुलैपासून ते जिल्हा कारागृहात होते. आज सायंकाळी अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने सुरक्षा रक्षकांनी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले. मृत्‍यूची माहिती मिळताच नातेवाइक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्‍यांची गर्दी पाहता जिल्हा रुग्णालयात तगडा पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. डांगे यांना खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले असल्याचे नातेवाईक सांगत होते.

तब्येत खराब असूनही त्यांच्यावर वेळेत उपचार केले नाही. त्यामुळे कारागृह प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे डांगे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलगा शिवराज आणि मुलीने केला आहे. खोटे आरोप करणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवू देणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतल्याने जिल्हा रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

बुलडाणा कारागृह
बुलडाणा कारागृह
बातम्या आणखी आहेत...