आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकावर काळाचा घाला:भरधाव कंटेनर व कारच्या अपघातात युवकाचा मृत्यू; जीवनाची स्वप्ने रंगणाऱ्या युवकावर काळाचा घाला

मेहकर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव जाणाऱ्या कंटेनरने समोरुन येत असलेल्या कारला जबर धडक दिली. या भीषण अपघातात एका २८ वर्षीय युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज ४ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास मेहकर बायपासवरील हॉटेल निवांत वाइन बार जवळ घडली. विशेष म्हणजे या अपघातातील मृत युवकाचे अकरा दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. सुखी संसाराची स्वप्ने रंगवत असतानाच त्याच्यावर काळाने घाला घातला आहे. या घटनेमुळे आंध्रुड गावांवर एकच शोककळा पसरली आहे.

तालुक्यातील आंध्रुड येथील गोपाल शामराव देशमुख वय २८ या युवकाचा फोटोग्राफरचा व्यवसाय होता. मागील २३ मार्च रोजी त्याचे मोठ्या थाटात लग्न झाले होते. दरम्यान, तो व त्याचा मित्र उमेश दशरथ अंभोरे वय २२ हे दोघे एम. एच. २० /एफ यु/ ९१११ या क्रमांकाच्या कारने औरंगाबादवरून आंध्रुड कडे जात होते. तर विरुद्ध दिशेने आर.जे. ५२/ जि.ए/ २५९० या क्रमाकांचा कंटेनर नागपूरकडून औरंगाबादकडे जात होता. दरम्यान, आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास मेहकर बायपासवरील हॉटेल निवांत वाइन बारजवळ येताच कंटेनर व कारची समोरासमोर धडक झाली.

हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात कारचा अक्षरशा चुराडा झाला आहे. या अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने गोपाल देशमुख याचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर त्याचा मित्र उमेश अंभोरे हा गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे बायपासवरुन जाणारी वाहतूक चार तास ठप्प पडली होती. या प्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अंगावरची हळद सुकण्यापूर्वीच गोपालचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.

बातम्या आणखी आहेत...