आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:पत्नीचा मृत्यू; पती विरुद्ध खुनाचा गुन्हा

खामगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रागाच्या भरात पतीने काठीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील शिराळा येथे घडली. प्रकरणी हिवरखेड पोलिसांनी पती विरुध्द गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. या घटनेमुळे शिराळा गावात एकच खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील शिराळा येथील एकनाथ महादू वनारे (७५) व त्यांची पत्नी पार्वती (७०) यांच्यात १६ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घरगुती कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. या भांडणामुळे संतप्त झालेल्या एकनाथ याने पत्नी पार्वतीला काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना त्यांच्या शेजारील लोकांच्या लक्षात येताच ते घटनास्थळी दाखल झाले. यावेळी शेजाऱ्यांनी तिला येथील शासकीय रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच हिवरखेडचे ठाणेदार गजानन वाघ, पोलिस निरीक्षक वसंत पवार, गजानन भोपळे, पोहेकाँ राजेश हिवराळे, नापोकाॅ अमोल जाधव यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला.

बातम्या आणखी आहेत...