आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:पीक विम्याची रक्कम खात्यात जमा करून ओला दुष्काळ जाहीर करा

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येवू नये, अंशकालीन कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन बुधवारी आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.आपने दिलेल्या निवेदनानुसार, मागील ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या शेतकऱ्यांची पीक विम्यावर मदार होती.

परंतु विमा कंपन्यांनी तुटपुंजी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली. त्यामुळे पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, तसेच कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु हा निर्णय ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्याचे नुकसान करणारा आहे.

त्यामुळे शाळा बंदचा निर्णय मागे घेण्यात यावा, अंशकालीन कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे, यासह इतर मागण्या करण्यात आल्या आहेत. याच मागण्यासाठी आपच्या वतीने २३ डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. निवेदन देताना आपचे दीपक मापारी, इरफान शेख, विष्णू दांडगे, नानासाहेब जाधव, अमोल गवई, सईद शहा, अविनाश खंडाळे, सिकंदर शहा, सोनोने यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...