आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:बुलडाणा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा; शिवसेनेचे धरणे आंदोलन

खामगाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानभरपाई मिळण्यासाठी बुलडाणा जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

खामगाव तालुका व बुलडाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रभर परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना हतबल केले आहे. शेती पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी. बुलडाणा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, प्रा.अनिल अमलकार, रवी महाले, तालुकाप्रमुख विजय बोदडे, श्रीराम खेलदार, विजय इंगळे आदी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...