आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्थानिक स्वराज्य संस्थांतील मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत समर्पित आयोग शनिवार२८ मे रोजी अमरावती येथे उपस्थित राहून नागरिकांची मते जाणून घेण्याबरोबरच व्यक्ती, संस्थांकडून निवेदनही स्वीकारणार आहे. नागरिकांना आपली मते वेळेत मांडता यावीत व निवेदन सादर करण्यासाठी व्यक्ती व संस्थांनी आपल्या नावाची नोंदणी विभागीय आयुक्त कार्यालयात करावी, असे आवाहन आयोगाचे सदस्य सचिव पंकजकुमार यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती आणि शहरातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास (इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती) आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग गठित केला आहे. या समर्पित आयोगाने विभागवार कार्यक्रम जाहीर केला आहे. सपर्पित आयोगाच्या विभागवार भेटीच्या कार्यक्रमानुसार पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात २१ मे रोजी सकाळी साडे नऊ ते साडे अकरा या वेळेत, औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात २२ मे रोजी सकाळी साडे नऊ ते साडे अकरा या वेळेत, नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात २२ मे रोजी सायंकाळी साडे पाच ते साडे सात या वेळेत, कोकण भवन विभागीय आयुक्त कार्यालयात २५ मे रोजी दुपारी अडीच ते साडे चार या वेळेत तसेच नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात २८ मे रोजी सायंकाळी साडे चार ते साडे सहा या वेळेत नागरिकांना मते मांडता येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.