आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेग:दरवर्षी पेक्षा यंदा पावसाला विलंब; पावसाळयाला सुरुवात होताच शेती मशागतीच्या कामाला आला वेग

डोणगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्याला सुरूवात होताच डोणगाव परिसरात खरीप पूर्व शेती मशागतीला वेग आला आहे. दरवर्षी पेक्षा यंदा पावसाला विलंब झाल्याने शेती मशागतीला थोडा विलंब झाला होता मात्र चार दिवसात डोणगाव व परिसरात विविध ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्याने व मान्सून बुलडाणा जिल्ह्यात दाखल झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे शेती मशागतीला वेग आला असून बी-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.

मागील काही वर्षापुर्वी बैलाच्या माध्यमातून शेतीची मशागत केली जात होती. परंतु मागील काही वर्षांत मात्र ट्रॅक्टरने शेती मशागतीचे प्रमाण वाढले आहे. तसेच जोमदार पीक येण्यासाठी रासायनिक खताचा वापर देखील वाढला आहे. रासायनिक खतांचा भरमसाठ वापर वाढल्याने अनेक ठिकाणी जमीन नापीक होत आहे. त्यातच यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्याने पेरणी उशीरा होणार आहे. त्यातच खते, बियाणे व मशागतीचे दर वाढल्याने यंदा शेतकऱ्यांना चांगलाच भुर्दंड सोसावा लागत आहे. असे असले तरी मान्सून जिल्ह्यात दाखल झाल्यापासून शेतकरी शेतातील कामे करण्यास सज्ज झाला आहे. काही भागात शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.

बातम्या आणखी आहेत...