आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी; 19 डिसेंबरला हल्लाबोल आंदोलन

बुलडाणा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने विदर्भाचे स्वतंत्र राज्य तत्काळ निर्माण करावे, यासह इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने १९ डिसेंबर रोजी होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान भवनावर हल्लाबोल आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी, नक्षलवादाला आळा घालण्यासाठी, प्रदूषण व कुपोषण संपवण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने ‘स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ निर्मिती मिशन-२०२३’ अंतर्गत विधिमंडळाच्या पहिल्या दिवशी हल्लाबोल आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी वेगळे विदर्भ राज्य झालेच पाहिजे, केंद्र सरकारने विदर्भाचे स्वतंत्र राज्य तत्काळ निर्माण करावे, विजेची दरवाढ राज्य सरकारने तत्काळ मागे घ्यावी व शेती पंपाला दिवसाचे भारनियमन बंद करावे, वैधानिक विकास मंडळ नको, विदर्भ राज्यच हवे, अन्न-धान्यावरील जीएसटी रद्द करावा, बल्लारपूर, सुजातागड रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने तत्काळ मंजुरी प्रदान करून निधी उपलब्ध करून द्यावा, विदर्भातील अकरा जिल्हे ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावे, या व इतर मागण्यासाठी हल्लाबोल आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे नेते ॲड.वामनराव चटप, प्रकाश पोहरे, महिला आघाडी विदर्भ प्रदेशाध्यक्षा रंजना मामर्डे, डॉ.श्रीनिवास खांदेवाले, मुकेश मासुरकर, अरूण केदार आदींनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...