आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा प्रशासनाला निवेदन:शिवसेनेच्या सोहळ्यातील हल्ल्याप्रकरणी कारवाईची मागणी ; पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा

बुलडाणा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा सुरु असताना केवळ दडपशाही व दादागिरीचे राजकारण करणाऱ्यांनी आमच्या कार्यक्रमात धुडगूस घालून भ्याड हल्ला केला. संयमाची भूमिका आम्ही घेतली हा आमचा दोष आहे का? पोलिस प्रशासन उपस्थित असताना आणि मोबाइलमध्ये सगळे व्हिडीओ दिसत असतानाही हल्ल्याप्रकरणी दोषींवर कारवाईला उशीर का? असा थेट सवाल शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी जिल्हा प्रशासनाला करत घटनेचा निषेध म्हणून निवेदन दिले.

घटनेबाबत व्हिडीओ उपलब्ध असतानाही थातूरमातूर कारवाई करुन खऱ्या दोषींना पाठीशी घालण्याचे काम होत आहे. ही बाब गंभीर आहे. या घटनेची गंभीर दखल घेवून दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा शिवसेनेला आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदन देताना जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत, उपजिल्हाप्रमुख संजय हाडे, अशोक इंगळे, लखन गाडेकर, हेमंत खेडेकर,वैद्यकीय आघाडी तालुका प्रमुख डॉ.अरुण पोफळे, अल्पसंख्याक जि.प्र.सय्यद इकबाल, नीलेश राठोड, एकनाथ कोरडे,सुधाकर आघाव,विजय इतवारे, जगदिश मानवतकर,मोहन राजपूत,प्रविण सोनुने, गणेश श्रीवास्तव, विजय अजबसिंग राजपूत, विनोद गायकवाड, नितीन लोंढेकर, रामेश्वर बुधवत, अरुण बावणे, उमेश सोनुने, मंगेश इंगळे, गजानन भिंगारे, प्रफुल्ल जायभाये, रवि काकडे, किरण दराडे, सोनू पाटील, मधुकर रामचंद्र वराडे, राहुल जाधव,जितेंद्र भाकरे, संतोष जंजाळ,शेषराव सावळे, संभाजी देशमुख, मधुकर महाले, मधुकर सिनकर, किसन पवार, किशोर कानडजे, सचिन परांडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...