आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील छत्रपती शिवाजी महाराज नगर, नवाफैल, जुनाफैल, सतीफैल, मस्तान चौक, बर्डे प्लॉट या भागातील अनेक विद्युत खांब खराब झाले आहेत. बऱ्याच ठिकाणी विद्युत तारा लोंबकळलेल्या आहेत. यामुळे एखाद्यावेळी दुर्घटना होवून जीवित हानी होवू शकते. तरी या भागातील खराब झालेले विद्युत खांब त्वरित बदलण्यात यावे तसेच लोंबकळलेल्या विद्युत तारा दुरुस्त करण्यात याव्या, अशी मागणी माजी नगरसेवक प्रवीण कदम यांनी केली आहे. याबाबत त्यांनी वीज वितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले असून त्यात नमूद आहे की, शुक्रवार, दि.७ एप्रिल रोजी झालेल्या जोरदार पाऊस व वाऱ्यामुळे ओंकारेश्वर स्मशानभूमी कॉर्नर जवळील विद्युत खांब रस्त्यावर पडल्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या खांबांकरिता मागील ४ ते ५ महिन्यांपासून अनेक वेळा संबंधीत विभागाला सूचना दिलेल्या होत. परंतु या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्या ठिकाणी काही जीवितहानी झाली नाही, जीवावर बेतणाऱ्या अशा दोन ते तीन घटना आतापर्यंत या परिसरात झालेल्या आहेत. काही जीवितहानी झाल्यावरच आपण दखल घेणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. श्री. छत्रपती शिवाजी महाराज नगर नवा फैल व जुना फैल सतीफैल, मस्तान चौक व बर्डे प्लॉट हा भाग स्लम एरियामध्ये येत असून या भागातील अनेक जुने वीज खांब खालून सडले असून ते पडण्याच्या अवस्थेत आहेत.
अनेक विद्युत तारा या नागरिकांच्या घराला लागून आहेत. काही गल्ल्यांमध्ये लोंबकळलेल्या अवस्थेत आहेत. तरी लवकरात लवकर या भागातील सर्व्हे करून जी कामे अत्यंत तातडीने करावयाची आहेत ती कामे लवकरात लवकर करून द्यावी. अन्यथा लोकशाही मार्गांचा अवलंब करावा लागेल. अन्यथा काही अनुचित घटना झाल्यास त्याची जबाबदारी संबंधीत विभागाची राहील असा इशाराही कदम यांनी निवेदना अंती दिला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.