आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोणगाव येथे खड्ड्यामध्ये अडकली बस‎:खड्डा बुजवण्याची ग्रामस्थांसहित वाहनधारकांची मागणी‎

बुलडाणा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेहकर तालुक्यातील डोणगाव‎ येथील महामार्गावर गत काही‎ दिवसांपासून मोठमोठे खड्डे पडले‎ आहेत. या खड्ड्यामध्ये बस‎ अडकल्याची घटना शनिवार,‎ दि.८ एप्रिल रोजी दुपारी एक‎ वाजता घडली. चालकाने‎ प्रसंगावधान राखल्याने अनर्थ‎ टळला. हे खड्डे बुजवण्याची‎ मागणी ग्रामस्थांनी केली आहे.‎ मेहकर तालुक्यातील डोणगाव‎ येथे स्थानिक सहकारी‎ सोसायटीसमोर राज्य महामार्गावर‎ मोठमोठे खड्डे पडले आहेत.

या‎ खड्ड्यात पाणी साचत असल्याने‎ वाहन चालकांना अंदाज येत नाही.‎ त्यामुळे अपघाताची शक्यता आहे.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ दि.८ एप्रिल रोजी दुपारी‎ मालेगावकडे जाणाऱ्या बसच्या‎ चालकाला या खड्ड्याचा अंदाज‎ आला नाही.‎ त्यामुळे ही बस खड्ड्यात अडकली‎ होती. चालकाने प्रसंगावधान‎ राखत खड्डयातून बस कशीबशी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ बाहेर काढली. या खड्ड्यामुळे‎ मोठा अपघात घडण्याची शक्यता‎ नाकारता येत नाही. त्यामुळे हा‎ खड्डा लवकरात लवकर‎ बुजवण्याची मागणी डोणगाव‎ येथील ग्रामस्थांसह‎ वाहनचालकांनी केली आहे.‎