आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:जिजाऊ पतसंस्थेच्या बांधकामाची तोडफोड; पोलिस स्थानकात गुन्हा दाखल

शेगाव3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिजाऊ महिला पतसंस्थेच्या नवीन बांधकामाची तोडफोड करणारा आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पतसंस्थेच्या बांधकामावरील साहित्याची तोडफोड करुन बांधण्यात आलेले प्यारापीटदेखील तोडले. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली असता विश्वजीत सारंगधर लांबे हा तोडफोड करताना दिसला.

याबाबत बँकेचे कर्मचारी संतोष प्रल्हाद चिंचोळकर यांनी शहर पोलिस स्टेशनला तक्रार दिली असून पोलिसांनी याप्रकरणी विश्वजीत लांबेसह मनीष सारंगधर लांबे व दुर्गा सारंगधर लांबे (सर्व रा. फुलेनगर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...