आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निदर्शने:वन हक्कासाठी भूमी हक्क परिषदेची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने ; न्याय देण्याची मागणी

​​​​​​​बुलडाणा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हास्तरीय वन हक्क समितीकडे मोताळा तालुक्यातील प्रलंबित असलेल्या अपील प्रकरणात वनहक्क दावेदारांना न्याय देण्यात यावा, अन्यथा २० जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा भूमी हक्क परिषदेच्या वतीने साेमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून देण्यात आला. निवेदनानुसार, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय वन हक्क समितीकडे वनहक्काची प्रकरणे प्रलंबित आहेत. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात त्रुटी व संबंधितांनी दिरंगाई केली असून वन हक्क कायद्यानुसार सदरच्या वन हक्क दाव्याची तपासणी करण्यात आली नाही. जिल्हास्तरीय वन हक्क समितीने घेवूनच प्रलंबित असलेल्या वन हक्क अपील प्रकरणामध्ये योग्य तो न्याय देण्यात यावा आदी मागण्यांसाठी ही निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात के.जी. शाह, शिवदास घोती, रामकृष्ण मोरे, भास्कर धुरंधर, सुरेश गायकवाड यांच्यासह अतिक्रमणधारक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...