आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:बुलडाण्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांची निदर्शने

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांची फसवणूक करत विमा कंपन्यांनी कोट्यवधी रुपये लाटले आहेत. विमा कंपन्यांकडून योग्य मोबदला मिळावा. सोबतच रब्बी हंगामासाठी पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा व्हावा या मागण्यांसाठी जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी ह.पी तुम्मोड यांना जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर व जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत शिवसेनेने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांच्या मागण्यांकडे लक्ष वेधले.

यावेळी महिला आघाडी जिल्हा संघटिका जिजा राठोड, विधानसभा संघटक अशोक इंगळे, तालुकाप्रमुख लखन गाडेकर, शहर प्रमुख हेमंत खेडेकर, वैद्य.आ. तालुका प्रमुख डॉ अरुण पोफळे, शहर संघटक जगदीश मानतकर, उप तालुका प्रमुख विजय इतवारे, अमोल शिंदे, किसान सेनेचे एकनाथ कोरडे, आशिष खरात, सुधाकर आघाव, बबन खरे, रामदास काकडे, राहुल जाधव, राहुल शेलार, महिला आघाडीच्या नंदिनी रिंढे, पद्मा परदेशी, चंद्रकला राठोड, संगीता पवार, समाधान बुधवत, प्रभाकर मघाडे, अनिल मोरे, सचिन मिसाळ, रतन वानखेडे, दिनेश काळे, गणेश पालकर, रतन नरोटे, रामेश्वर बुधवत, मोहन निमरोट, योगेश पायघन, सतीश जंजाळ, शाम खडके, दीपक पिंपळे, प्रमोद सावळे, नामदेव काळे, पांडुरंग काळे, रघुनाथ चव्हाण, शेषराव सावळे, मधुकर महाले, सुधाकर मुंडे, बाबुराव भोसले, योगी पालकर, संभाजी देशमुख, गजानन बोडखे, नंदकिशोर देशमुख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...