आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:बिल्कीस बानो प्रकरणी स्त्री मुक्ती संघटनेची निदर्शने

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात दंगलीत बिल्कीस बानो या गरोदर महिलेवर अत्याचार करून कुटुंबातील सात जणांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी न्यायालयाने आरोपींना जन्मठेप दिली असताना गुजरात सरकारच्या आदेशाने आरोपी तुरुंगामधून सोडले जाणे ही मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे, असे प्रतिपादन प्रा.शाहिना पठाण यांनी केले. स्त्री मुक्ती संघटनेच्या वतीने आरोपींची जन्मठेप कायम ठेवावी, या मागणीसाठी आज गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रसंगी स्त्रीमुक्ती संघटनेच्या मीनलताई आंबेकर, प्रतिभाताई भुतेकर यांनीही गुजरात सरकारवर टीकास्त्र सोडले.

स्त्री मुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येवुन गुजरात दंगलीतील आरोपींना मोकळे सोडणाऱ्या सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. न्याय द्या, न्याय द्या, बिल्कीस बानोला न्याय द्या, अशा घोषणाबाजी करीत महिलांनी निदर्शने केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये गुजरात येथील रधीकपूर गावी बिल्कीस बानो या गरोदर महिलेवर अकरा जणांनी सामुहिक अत्याचार केला. तिच्या तीन वर्षीय मुलीला डोक्यात दगड घालून ठार मारण्यात आले. तसेच तीच्या परिवारातील सात सदस्यांची हत्या करण्यात आली. मुंबई सीजीआई कोर्टात या आरोपींना जन्मठेप सुनावण्यात आली. चौदा वर्षे शिक्षा भोगल्यानंतर एकाएकी गुजरात सरकारने या आरोपींना सोडून दिले. सरकारच्या या कृतीने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या अत्याचार प्रकरणातील आरोपीची जन्मठेप कायम ठेवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

या आंदोलनात मीनलताई आंबेकर, प्रा.शाहिना पठाण, डॉ.विजया काकडे, नवनिता चव्हाण, आशा इंगळे, रंजना वानखेडे, प्रतिभाताई भुतेकर, संघमित्रा कस्तुरे, ज्योत्स्ना जाधव, बानोबी चौधरी, वसुधा घुमरे, कल्पना पाटील, नम्रता पाटील, अनिता कापरे, शारदा वाघुळे, प्रमिला गवई, रेखा लांडे यांच्यासह इतर महिला सहभागी झाल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...