आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धाड:शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या कृषी केंद्रावर कृषी विभागाची धाड ; कृषी केंद्र चालकास रंगेहाथ पकडले

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पेरणीच्या तोंडावर कृषी केंद्र चालक शेतकऱ्यांची लूट करत असल्याचा धक्कादायक प्रकार आज शहरात उघडकीस आला आहे. तुम्हाला डीएपीचे खत घ्यायचे असेल तर आणखी एक दुसरे खत घ्यावेच लागेल, असा तगादा कृषी केंद्र संचालकांनी लावला. या बाबतची तक्रार एका शेतकऱ्याने तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे केली. त्यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी कृषी केंद्र चालकास रंगेहाथ पकडले. आज १ जून रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास शहरात हा प्रकार उघडकीस आला आहे. बसस्थानकाजवळ असलेल्या सागर सीड्स या कृषी केंद्रात शेतकऱ्यांना एक खताची थैली घ्यायची असेल तर त्यामागे ८०० रुपये अधिकचे मोजावे लागत होते. या प्रकाराबद्दल तालुक्यातील ढासाळवाडी येथील शेतकरी अजय शेवाळे यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत तालुका कृषी अधिकारी दिनकर मेरत कृषी केंद्रावर कारवाई केली.

अखेर त्या कृषी केंद्राचा परवाना निलंबित बुलडाणा येथील कृषी केंद्रावर खत विक्री करताना शेतकरी पिळवणूक होत असल्याची बाब कृषी अधिकाऱ्यांसमोर आज उघड झाल्यानंतरदेखील कृषी अधिकाऱ्यांनी काहीच कारवाई न केल्याने शिवसेना कार्यकर्ते संदीप गायकवाड यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या दिला. यावेळी कृषी केंद्रावर निलंबनाची तर अधिकाऱ्यास कारणे दाखवाची कारवाई केली असल्याचे नाईक म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...