आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्थानिक विदर्भ महाविद्यालय बुलडाणा येथील गृह अर्थशास्त्र व वाणिज्य विभाग अंतर्गत आईस फॅक्टरी बुलडाणा येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्यात सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना आईस फॅक्टरी बुलडाणा येथे नेण्यात आले व बर्फ बनवताना त्यावर होणाऱ्या विविध प्रक्रिया समजून सांगण्यातआले. बर्फ बनवताना पाण्याची तापमान किती अंश असावे व त्यावर कशा पद्धतीने प्रक्रिया करण्यात येते.
बनवण्याच्या पेट्या कशा पद्धतीने बसवलेल्या असतात. हे सर्व विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले तसेच व्यवसाय रोजगार पूरक मार्गदर्शन या प्रसंगी करण्यात आले. फॅक्टरी मधल्या विविध यंत्रणा दाखवल्या व तेथील मॅनेजर यांनी बर्फ बनवण्याची पद्धत विद्यार्थ्यांना समजावुन सांगितली. आपल्याला रोजगाराच्या संधी कशा प्राप्त होऊ शकतात. याविषयी मार्गदर्शन मान्यवरांनी केले.
इंडस्ट्री मधील कामकाज कसे चालते याचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी निरीक्षण केले. या प्रसंगी गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सीमा सोनोने यांनी आपल्या गृह अर्थशास्त्राच्या विद्यार्थिनींना रोजगार प्राप्तीच्या विविध संधी व व्यवसाय पूरक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला कॉमर्स व गृह अर्थशास्त्र विभागाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. हुडेकर, प्रा. डॉ. संगीता पवार, प्रा. वाघमारे प्रा. डॉ. शिराळे, प्रा. प्रगती पाटील याप्रसंगी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना व्यवसाय पूरक मार्गदर्शन व्हावी व इंडस्ट्रीचे प्रत्यक्ष कामकाज कसे चालते हे प्रत्यक्ष पाहता यावे या हेतूने या अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.