आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन यात्रा:पाचाड येथे ‘माँ जिजाऊ अभिवादन यात्रा’ रवाना ; राजवाड्यातील पवित्र जलाने होणार अभिषेक

सिंदखेडराजा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचे जन्मस्थळ ते स्मृतिस्थळ असलेल्या रायगड जवळील पाचाड अशी जिजाऊ अभिवादन यात्रेला जिजाऊ पूजनाने सुरुवात झाली. जिजाऊ राजवाडा येथून १५ जून रोजी सकाळी दहा वाजता ही यात्रा पाचाडकडे जाण्यासाठी रवाना झाली असून १७ जून रोजी पाचाड येथे पोहचणार आहे. दरम्यान, जिजाऊंच्या स्मृती स्थळावर राजवाड्यातील पवित्र जलाने अभिषेक करून स्मृती दिनानिमित्त जिजाऊ माँसाहेब यांना अभिवादन करण्यात येणार आहे.

राजे लखुजीराव जाधव यांचे तेरावे वंशज राजे शिवाजी राजे जाधव यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच ही यात्रा सुरू करण्यात आली आहे.राजवाडा परिसरात सजवलेल्या रथावर जिजाऊ माँसाहेब यांची प्रतिमा ठेवण्यात आली. प्रारंभी सकाळी जिजाऊ माँसाहेब यांच्या राजवाड्यातील प्रतिमेचे व राजवाड्यातील पवित्र जलाचे पूजन शिवाजी राजे जाधव यांनी सपत्नीक केले. त्यानंतर रथावरील प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार तोताराम कायंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी, नगराध्यक्ष सतीश तायडे, सामाजिक कार्यकर्ते विजय तायडे, उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार सुनील सावंत, पोलिस निरीक्षक केशव वाघ, यात्रा समन्वयक अॅड.जयसिंगराव देशमुख, गंगाधर जाधव नगरसेवक, सर्वपक्षीय कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान,१७ जून रोजी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांची प्रमुख उपस्थितीत पाचाड येथे जिजाऊ माँसाहेब यांच्या समाधीचे पूजन करून अभिवादन करण्यात येणार आहे. सदर यात्रा जालना, बदनापूर, औरंगाबाद, नेवासा, घोडेगाव, अहमदनगर मार्गे जात सुपा येथे यात्रेचा मुक्काम होणार आहे. १६ जून रोजी सुपा येथून शिखरापूर, लोणीकंद, वाघोली येथे स्व. पिलाजीराव जाधवराव यांच्या समाधी स्थळाला अभिवादन करुन महाड येथे लाडवली येथील नवयुग विद्यापीठात मुक्कामी राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...