आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युतीसाठी तयार:भाजप सोडून वंचित आघाडी कोणासोबतही युतीसाठी तयार ; वंचित आघाडीची बैठक

बुलडाणा7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप सोडुन कोणासोबतही युती करण्यास तयार आहे. परंतु ही युती सन्मानपूर्वक झाली पाहिजे, असे प्रतिपादन वंचितचे जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव यांनी केले.

आज वंचित बहुजन आघाडीची महत्वपूर्ण बैठक जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यालयात महत्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकी अगोदर जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव यांच्या मातोश्री यांचे २ जून रोजी निधन झाल्यामुळे त्यांना अभिवादन करुन बैठकीला सुरवात करण्यात आली. बैठकीला जिल्ह्यातील होणाऱ्या नगर पालिका व जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भात आढावा जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव यांनी घेतला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर व प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर व जिल्हा प्रभारी धैर्यवर्धन फुंडकर यांच्या आदेशाने आगामी नगर पालिका व जि.प. व प.स निवडणुकीत भाजप सोडून आम्ही कुणासोबतही युती करण्यास तयार आहोत. परंतु युती ही सन्मानपूर्वक झाली पाहिजे असे, प्रतिपादन वंचितचे जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव यांनी बैठकी दरम्यान केले. यावेळी जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे, बाला राऊत, भीमराव शिरसाठ, ॲड.अमर इंगळे यांनी आपले विचार व्यक्त केले. बैठकीला दत्ता राठोड, संदीप लहाने, मिलिंद वानखेडे, दिलीप राठोड, संजय धुरंधर, बळी मोरे, विशाल मोरे, विजय दोळे, विजय राऊत, दिलीप राजभोज, भीमराव खराटे, महेंद्र पन्हाळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...