आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वक्तव्य:सावरकरांबद्दल‎ अपमानास्पद‎‎ वक्तव्य सहन करणार नाही‎

खामगाव‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुशल हिंदू संघटक, थोर‎ स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्यवीर‎ सावरकर यांच्याबद्दल काँग्रेस‎ पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी‎ केलेल्या वक्तव्याचा जाहीर‎ निषेध करण्यासाठी शुक्रवार, १८‎ नोव्हेंबर रोजी शहरात निषेध‎ सभा पार पडली. यावेळी सभेला‎ संबोधित करताना सर्व‎ मान्यवरांनी राहुल गांधींच्या‎ वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध‎ केला. यावेळी बोलताना‎ आमदार ॲड. आकाश फुंडकर‎ यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर‎ यांच्याबद्दल अपमानास्पद‎ वक्तव्य केल्यास आम्ही सहन‎ करणार नाही असा इशारा दिला.

‎ या निषेध सभेत भाजपचे‎ प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार‎ डॉ.संजय कुटे यांनी देखील तिव्र‎ शब्दात राहुल गांधी यांचा निषेध‎ व्यक्त करत राहुल गांधी आणि‎ समजूतदारपणा याचा काहीच‎ संबंध नसल्याची बोचरी टिकाही‎ केली. तसेच भाजपचे माजी‎ आमदार चैनसुख संचेती,‎ शिवराय कुळकर्णी, विनोद वाघ,‎ खासदार रक्षा खडसे, आमदार‎ हरीश पिंपळे, आमदार प्रकाश‎ भारसाकळे, आमदार डॉ.‎ रणजित पाटील, आमदार प्रताप‎ अडसड, आमदार वसंत‎ खंडेलवाल, विजयराज शिंदे,‎ माजी आमदार बळीराम‎ सिरस्कार, सोशल मीडिया‎ सेलचे संयोजक सागर फुंडकर‎ यांनी देखील राहुल गांधी यांचा‎ तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला.‎ यावेळी उपरोक्त नेत्यांसह‎ भाजपा व बाळासाहेबांची‎ शिवसेना पक्षांचे नेते व‎ पदाधिकारी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...