आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजैन धर्मीयांचे श्री सम्मेद शिखरजी यास पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ शहरातील सकल जैन समाजाच्या वतीने आज २१ डिसेंबर राेजी शहर बंद व मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.झारखंड येथील श्री सम्मेद शिखरजी या तीर्थस्थळाला झारखंड राज्य सरकारच्या अनुमतीने केंद्र सरकारने पर्यटन स्थळ घोषित केलेले आहे. झारखंड राज्य सरकार व केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ शहरातील जैन बांधवांनी दिवसभर दुकाने बंद ठेवली होती. यावेळी शहरातून सकाळी १० वाजता मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा भाजी मंडी येथील जैन मंदिरापासून प्रारंभ करण्यात आला. शहरातील जुनी नगरपालिका चौक, महाद्वार चौक, अहिंसा मार्ग, संतोष चौक, बसस्थानक चौक मार्ग मार्गक्रमण करत तहसील कार्यालय येथे पोहोचला त्यानंतर जैन समाजाच्या वतीने निवेदन तहसीलदार श्याम धनमणे यांना देण्यात आले. शहर बंद व मोर्चाच्या आयोजन सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आले होते. पर्यटन स्थळ घोषित करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ, सकल जैन समाजाला माजी मंत्री व आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी पाठिंबा दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.