आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेऊळघाट ग्रामपंचायतच्या एका सदस्याला चांगलाच हादरा बसला आहे. अनुसूचित जमाती या प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्याने आपले जात प्रमाणपत्र लबाडीने सक्षम प्राधिकाऱ्याची फसवणूक करून प्राप्त केले. त्यामुळे हे प्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समिती अमरावतीने दिल्यानंतर या ग्रामपंचायत सदस्याला जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी ८ जून रोजी े अपात्र घोषित केले आहे. मागील जानेवारी २०२१ मध्ये देऊळघाट ग्रामपंचायतीच्या सतरा सदस्यांसाठी निवडणूक पार पडली. यावेळी वॉर्ड क्रमांक दोन मधून इस्माईल खान मोहम्मद खान यांनी अनुसूचित जमाती या राखीव प्रवर्गासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्याच्याविरुद्ध दुसरा कोणताही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने त्याची अविरोध निवड घोषित करण्यात आली होती. याबाबत जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले की, राज्य निवडणुक आयोगाने एप्रिल ते डिसेंबर २०२० या महिन्यात मुदती संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राखीव जागेवर निवडुन आलेल्या उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र बारा महिन्याच्या आत सादर करणे आवश्यक आहे. परंतु इस्माईल खान मोहम्मद खान यांनी ग्रामपंचायत देऊळघाट येथील अनुसूचित जमाती प्रवर्गातील जागेवर निवडणुक लढवताना राज या अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर केले. या प्रकरणात देऊळघाट येथील माजी सरपंच गजानन उल्ला खान आरिफ खान मुस्ताक अहमद व जुनेद खान यांनी तक्रार दाखल करीत इस्माईल खान विरुद्ध आक्षेप नोंदवला होता. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती अमरावती यांनी अर्जदार व गैरअर्जदार यांची बाजू ऐकून २३ मे रोजी इस्माईल खान मोहम्मद खान यांच्या राज या अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध असल्याचा आदेश पारित केला आहे. त्यामुळे इस्माईल खान मोहम्मद खान रा. देऊळघाट यांची निवड रद्द केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.