आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Buldhana
  • Development Oriented Pokra Scheme Became A Boon For Farmers In Sindkhedraja Taluka; Government Distributes Grant Of Rs. 16 Crore To 2 Thousand 882 Farmers | Buldhana Marathi News

दिलासा:सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी विकासाभिमुख पोकरा योजना ठरली वरदान ; शासनाकडून 2 हजार 882 शेतकऱ्यांना सोळा कोटींचे अनुदान वाटप

कनिगाव राजा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दविसेंदविस कमी पर्जन्यमान होत असल्यामुळे शेती व्यवसाय दरवर्षी तोट्यात जात आहे. परिणामी बुलडाणा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या संख्येत दविसागणिक वाढ होत आहे. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती न करता तांत्रिक शेती करावी. जेणेकरून शेती नफ्यात आणता येईल. तसेच शेतीशी निगडित जोडधंदे करावे, यासाठी शासनाने शेतकऱ्यांसाठी विकासाभिमूख पोकरा ही योजना अंमलात आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सिंदखेडराजा तालुक्यात २ हजार ८८२ शेतकऱ्यांना १५ कोटी ८५ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना बऱ्यापैकी दिलासा मिळाला आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. शेती व शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी नव संजीवनी ठरत आहे. मागील २०१७ पासुन सुरू झालेली ही योजना २०२४ पर्यंत राबवण्यात येणार असल्याचे शासनाने यापूर्वीच जाहीर केले आहे. या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागते. त्यानंतर ग्रामसभेच्या माध्यमातून लाभार्थीची नविड करून संबंधित शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.

त्यामध्ये यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन, शेततळे, शेतीशाळा, कंपोस्ट खत निर्मिती, पीव्हीसी पाइप, फळबाग प्रमाणित बियाणे उत्पादन तंत्रज्ञान, विहिरीचे पुनर्भरण, तुती लागवड, शेडनेट, तुषार सिंचन, विद्युत पंप, शेळीपालन, इत्यादींसाठी अनुदान देण्यात येते. या योजनेसाठी तालुक्यातील १४ हजार ९५६ लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले होते. या प्राप्त अर्जापैकी २ हजार ८८२ शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेऊन उत्पादन वाढीसाठी हातभार लावला आहे. या योजनेसाठी सिंदखेड राजा तालुक्यातील १९ गावाची नविड करण्यात आली आहे.

पोकरा योजना ठरली शेतकऱ्यांसाठी वरदान
या योजनेचा लाभ मिळण्यासाठी तालुक्यातील १४ हजार ९५६ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी २ हजार ८८२ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असल्याचे दिसून येत आहे. परंतु अद्यापही तालुक्यातील जवळपास बारा हजार शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. त्यांच्या उन्नतीसाठी त्यांना या योजनेचा लाभ देण्याची गरज आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा
हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतकऱ्यांना सक्षम करणे व शेती व्यवसाय किफायतशीर करण्यास सहाय्य करणे हा या योजनेचा मूळ उद्देश आहे. ऑनलाइन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी कृषी सहायकाशी संपर्क करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...