आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्साह:खाटू श्याम बाबांच्या भजन संध्या‎ कार्यक्रमात भाविक मंत्रमुग्ध‎

शेगाव‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात ३ मार्च रोजी खाटू श्याम बाबा‎ फागण उत्सव मोठ्या उत्साहात‎ साजरा करण्यात आला.‎ उत्सवानिमित्त सकाळी बडा बालाजी‎ मंदिर येथून खाटू श्याम बाबाच्या‎ प्रतिमेने सजवलेल्या रथ आणि समोर‎ महिला व पुरुष यांच्या हातामध्ये खाटू‎ श्याम बाबाचे निशाण फडकत होते.‎ ही निशाण यात्रा शहराच्या प्रमुख‎ मार्गाने निघून अग्रसेन भवनात‎ उभारलेल्या खाटू श्याम दरबारात‎ पोहोचली.

या ठिकाणी संध्याकाळी‎ आयोजित भजन संध्या कार्यक्रमात‎ भक्तगण भाव विभोर होऊन‎ थिरकताना दिसले.‎ राजस्थान मधील खाटू श्याम बाबा‎ देवस्थान हे संपूर्ण भारतामध्ये नाव‎ प्रख्यात आहे. राजस्थानी समाजातच‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ नव्हे तर इतरही अनेक समाजात खाटू‎ श्याम बाबाचे भक्त मोठ्या प्रमाणावर‎ आहेत. तर अनेक राज्यांत खाटू श्याम‎ बाबाचे मंदिर आणि त्या ठिकाणी‎ मोठ्या प्रमाणावर साजरे केले जाणारे‎ उत्सव पहावयास मिळतात. खाटू‎ श्याम बाबाचा प्रमुख उत्सव म्हणजे‎ फागण उत्सव.

या उत्सवाला विशेष‎ महत्त्व असल्याने संपूर्ण भारतात ठीक‎ ठिकाणी हा उत्सव साजरा करण्यात‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ येतो. शहरात मागील बारा वर्षांपासून‎ हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा‎ करण्यात येतो त्यामध्ये सकाळी खाटू‎ श्याम बाबाची प्रतिमा असलेल्या‎ रथात बाबा विराजमान असतात. तर‎ समोर एकाच रंगाच्या पोशाखामध्ये‎ महिला व पुरुष भक्तगण हातात खाटू‎ श्याम बाबाचे निशान घेऊन बाबांच्या‎ भजनावर थिरकताना दिसतात. ही‎ निशाण यात्रा शहरातील मुख्य‎ मार्गावरून निघत जाऊन स्थानिक‎ अग्रसेन भवन मध्ये उभारलेल्या खाटू‎ श्याम बाबा धाम मध्ये पोहोचून त्या‎ ठिकाणी तेरे बारे मे मै सोचू श्याम, ये‎ चेहरा खिल जाये, हाल क्या होगा मेरा‎ जबतू सच मे मिल जाये, अशा‎ भावपूर्ण ओळी मधून त्या ठिकाणी‎ निशाणी यात्रेचे समापन करण्यात येते.‎

त्यानंतर संध्याकाळी भजन संध्या‎ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी‎ गायिका कृतिका मालविया आणि‎ अर्चना पुरोहित यांनी गायलेल्या श्याम‎ बाबांच्या भजनामध्ये तर फक्त गण‎ भावविभोर होऊन नाचताना दिसले.‎ ही भजन संध्या रात्री अकरा वाजेपर्यंत‎ चालली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ४‎ मार्च रोजी भोजन प्रसादी आणि‎ होमचे दर्शन भाविकांनी घेतले.‎ यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती‎ होती.‎

बातम्या आणखी आहेत...