आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यात्रा भरली:योगिनी मातेचे भाविकांनी घेतले दर्शन; दोन वर्षानंतर २ एप्रिल रोजी यात्रा भरली

खामगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गायगाव बु. येथील आसरा माता संस्थान मधील स्वयंभू व जागृत ९० योगिनी (पऱ्यांचे) गुढीपाडव्याच्या दिवशी २ एप्रिल रोजी भाविक-भक्तांनी दर्शन घेऊन योगिनी मातेपरी आपली श्रद्धा प्रकट केली. सकाळी सहा वाजेपासूनच भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. मिळेल त्या वाहनाने भाविक-भक्त येथे दर्शनासाठी आले होते. दोन वर्षानंतर २ एप्रिल रोजी यात्रा भरली होती.

यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे २ एप्रिलपासून राज्य सरकारने कोरोनाचे सर्व प्रतिबंध उठवल्यामुळे प्रशासनाच्या वतीने गायगाव येथील आसरा माता मंदिरात गुढीपाडव्याच्या दिवशी भाविकांना दर्शनाची अनुमती दिली होती. यावेळी शेगाव ग्रामीणचे ठाणेदार जवंजाळ यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी भाविक भक्तांची उपस्थिती होती. जिल्ह्यातूनच नव्हे तर इतर राज्यातून ही हजारो भाविक भक्त दर्शनासाठी आले होते.

यावेळी आसरा माता मंदिर संस्थानचे अध्यक्ष सुरेश अग्रवाल, उपाध्यक्ष विजय ढगे, सचिव सुभाष चव्हाण, प्रकाश ढगे, गजानन ढगे, संजय ढगे, गजानन रायकर, भास्कर डोलकर, श्रीधर पाटील, शिवाजी हुकरे, महेंद्र सोनवणे, विश्वास हिवराळे, सुरेश सोळंके, गुलाब पवार मंदिराचे पुजारी आदिनाथ भोईटे यांनी भाविकांची दर्शनासाठी चोख व्यवस्था ठेवली होती.

बातम्या आणखी आहेत...