आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:मारहाण करणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्यासाठी धुरंधर दाम्पत्याचे उपोषण

बुलडाणा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रा. पं. सदस्य असलेल्या पत्नीस मारहाण करणाऱ्या अंबादास पाटील यांच्यासह इतरावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी खामगाव तालुक्यातील आमसरी येथील दीपक समाधान धुरंधर यांनी परिवारासह येथील जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर शनिवारपासून उपोषणास सुरूवात केली आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले, मी अपंग असून पत्नी ग्रामपंचायत सदस्य आहे. मागील २७ डिसेंबर रोजी गावातील पाटील व इतर आरोपींनी पत्नीस मारहाण केली. या बाबतची तक्रार जलंब पोलिसात दिली होती. परंतु, पोलिसांनी आरोपींविरुद्ध ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर मी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता जलंब पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आरोपींविरुद्ध मारहाणीसह ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल केला. मारहाण प्रकरणातील हिंगणे हे एका राजकीय पक्षाचे तालुकाध्यक्ष आहेत. या पदाचा दुरुपयोग करून ते दबाव निर्माण करतात. त्यामुळे मारहाण करणाऱ्यांना अटक करण्यात यावी.

बातम्या आणखी आहेत...