आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री गजानन महाराज प्रगट दिन उत्सवानिमित्त श्री संत गजानन महाराजांच्या दर्शन घेण्यासाठी झाडेगाव ते शेगाव पायदळ दिंडी निघाली आहे. या दिंडीत साडे तीनशे भाविक सहभागी झाले आहे. त्यामध्ये दोनशे भाविक महिला व दिडशे भाविक पुरुषाचा समावेश आहे. गण गण गणात बोते टाळ मृदुंग विना व अभंगांच्या गजरात संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.
गावातील लहान मुले पताका घेऊन श्री संत गजानन महाराज यांच्या चरणी नतमस्तक झाले. गावात वारकरी संप्रदायाचा पाया जोपासला जावा व गावातील मुलांना सांप्रदायाची ओढ लागावी, यासाठी लहान मुलांना दिंडीच्या सहवासात घेतले. झाडेगाव शेगाव पायदळ दिंडी वारीचे हे २६ वे वर्ष आहे. भाविक महिलांच्या डोक्यावरील तुळसाबाई व कळस आणि दिंडीला शिस्त लावण्यासाठी चोपदार हे लक्ष वेधून घेत होते. श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक व श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरा पर्यंत भाविकांनी पावल्या खेळल्या. त्यामुळे ही दिंडी भाविकांचे लक्ष वेधून घेत होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.