आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्र:बसस्थानकात घाणीचे साम्राज्य, व्यावसायिकांना पत्र

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बसस्थानकात घाणच घाण, एसटी महामंडळ पाहतेय प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत, अशा आशयाचे वृत्त दिव्य मराठीत २८ ऑक्टोबर रोजीच्या अंकात प्रसिद्ध होताच बुलडाणा आगार प्रमुखांनी बस स्थानकात असलेल्या सर्वच व्यावसायिकांना पत्र पाठवले आहे. यात त्यांनी बसस्थानक परिसरातील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासंबंधी सूचना केल्या आहेत.

आगार प्रमुखांनी व्यावसायिकांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपल्या अधिनस्त असलेल्या हॉटेलचे सांडपाणी बसस्थानक परिसरात पसरत असल्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. तरी रोगराई निर्माण होऊ नये, म्हणून आपण बस स्थानक परिसरातील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावावी. अन्यथा आपल्यावर पोलिस प्रशासानामार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या पत्राची प्रत विभाग नियंत्रक, बुलडाणा, सुरक्षा व दक्षता अधिकारी राज्य परिवहन बुलडाणा, पोलिस ठाणे बुलडाणा, मुख्याधिकारी नगर पालिका बुलडाणा, अन्न व औषध प्रशासन अधिकारी, बुलडाणा व विभागीय स्थापत्य अभियंता बुलडाणा यांना पाठवण्यात आली आहेत. आगार प्रमुखांनी हे पत्र जरी पाठवले असले तरी या घाणीला दोषी कोण हे अजून स्पष्ट झाले नाही. जे व्यापारी संकुल आहे ते भाडे तत्वावर आहे. अनेक दुकाने भाड्याने असल्याने ते या जागेचे मूळ मालक नाही. या जागेचे मूळ मालक राज्य परिवहन आहे. परिवहन विभागाने घाण पाणी वाहते करण्यासाठी नाली व ढापे मोठे करणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...