आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:बुलडाणा रस्त्यावर घाणीचे साम्राज्य; चिखली नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष, परिसरात पसरली दुर्गंधी

चिखली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात फिरून घनकचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्या गेल्या काही दिवसांपासून दांडी मारत आहे. घरात जमा झालेला कचरा नागरिक राऊतवाडी भागातील बुलडाणा रोडवरील नदीच्या पुलावर आणून टाकत आहे. त्यामुळे या भागाला डम्पिंग ग्राऊंडचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तसेच सदर रस्त्याने प्रवास करणाऱ्या आणि मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून या संपूर्ण प्रकाराकडे नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

शासनाने नगरपालिकेवर मुख्याधिकाऱ्यांची मुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. नगर पालिकेमध्ये जनसेवकच नसल्याने सामान्य नागरिकांची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी तेथे हक्काचे असे कोणीच नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहे. या प्रकाराकडे कुठल्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व संघटनेचे पदाधिकारी लक्ष देण्यास तयार नाही. तर या भागातील नागरिकांच्या मतांवर डोळा ठेवून काही संधीसाधू पुढारी अधूनमधून या भागात फिरून स्वच्छता मोहीम हाती घेत असतात. मात्र ओबीसी आरक्षणामुळे नगरपालिका निवडणूक लांबणीवर पडल्याने त्यांचीही स्वच्छता मोहीम थंड पडली असल्याचे वास्तव आहे.

बातम्या आणखी आहेत...