आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वावलंबन प्रणाली:मलकापूर उपजिल्हा‎ रुग्णालयांत दिव्यांग बोर्ड‎ लवकरच सुरु होणार‎

बुलडाणा19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मलकापूर उपजिल्हा रुग्णालय येथे‎ दिव्यांग व्यक्तीची तपासणी व दिव्यांग प्रमाणपत्र‎ देण्याकरिता दिव्यांग बोर्ड लवकर सुरु होणार आहे,‎ अशी माहिती अपंग जनता दल संघटनेचे राज्य सचिव‎ कलीम शेख यांनी दिली असून मलकापूर उपजिल्हा‎ रुग्णालय हे दिव्यांग बोर्ड घोषित करण्यात आले आहे.‎ शासन निर्णयानुसार जिल्हा रुग्णालय बुलडाणा व‎ खामगाव येथील दिव्यांग बोर्डाद्वारे महिन्यातील दर‎ बुधवारी व शुक्रवारी दिव्यांग व्यक्तीची तपासणी व‎ प्रमाणपत्र स्वावलंबन प्रणालीद्वारे देण्याचे काम सुरु‎ असुन मलकापूर तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना‎ दिव्यांग प्रमाणपत्रासाठी बुलडाणा किंवा खामगाव येथे‎ जावे लागत असल्यामुळे दिव्यांग व्यक्तीची गैरसोय होत‎ व्हायची.

अनेक वेळा निवेदन केले आहे. वैद्यकीय‎ अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय मलकापूर यांनी दिव्यांग‎ बोर्ड सुरु करण्याबाबत आयुक्त अपंग कल्याण‎ आयुक्तालय, पुणे यांच्या कार्यालयाशी पत्रव्यवहार‎ केला असून उपजिल्हा रुग्णालय, मलकापूर येथे‎ दिव्यांग बोर्ड सुरु करण्यासाठी युजरआडी व पासवर्ड‎ प्राप्त झालेले आहे. तरी उपजिल्हा रुग्णालय, मलकापूर‎ येथे दिव्यांग व्यक्तींची तपासणी व दिव्यांग प्रमाणपत्र‎ देण्याकरता दिव्यांग बोर्ड सुरु होणार, अशी माहिती‎ संघटनेचे राज्य सचिव कलीम शेख यांनी दिली.‎

बातम्या आणखी आहेत...