आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी:दिव्यांग शेतकरी सोलार‎ दुरुस्तीच्या प्रतीक्षेत‎

मेहकर‎10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रात्रीच्या त्रासापासून व‎ भारनियमनापासून मुक्ती‎ मिळण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना‎ सोलर पंप दिले आहेत. परंतु हे‎ सोलर पंप मागील दोन वर्षापासून‎ वादळी वाऱ्याने उन्मळून पडले‎ आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी‎ हंगामातील पिकांना पाणी देणे‎ कठीण झाले आहे. त्यामुळे‎ सोलारची दुरुस्ती कधी होणार या‎ कडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.‎

लोणार तालुक्यातील अंजनी खुर्द‎ येथील दिव्यांग शेतकरी विजय उत्तम‎ गायकवाड व गजानन उत्तम‎ गायकवाड यांच्या अंजनी‎ शिवारातील शेतात तीन वर्षांपूर्वी‎ सीआरआय कंपनीचे सोलर पंप‎ बसविण्यात आले होते. परंतु दोन‎ वर्षांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह‎ पावसामुळे सोलार पंप उन्मळून‎ पडले आहेत. याबाबतची तक्रार‎ शेतकऱ्याने संबंधित कंपनीकडे‎ केली असता, आज बदलून देतो‎ उद्या बदलून देतो, असे तोंडी उत्तर‎ देऊन शेतकऱ्यांची बोळवण‎ करण्यात येत आहे. अद्यापही‎ सोलरची दुरुस्ती करण्यात न‎ आल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचन‎ करणे कठीण झाले आहे. पाण्या‎ वाचून रब्बीचे पीक वाया जाणार‎ असल्याची भीती शेतकरी व्यक्त‎ करत आहेत.‎ वादळी वाऱ्यामुळे उन्मळून पडलेले सोलर पंप.‎

बातम्या आणखी आहेत...