आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण यशस्वी; जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांचे अधिकाऱ्यांना मार्गदर्शन

शेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नगर पालिका टाऊन हॉल येथे २४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व एनडीआरएफ टीम यांचे संयुक्त विद्यमाने खामगाव, शेगाव, जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसाठी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

या प्रशिक्षणासाठी प्रामुख्याने चारही तालुक्यातील मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलिस पाटील, कोतवाल हे उपस्थित होते. यावेळी एकूण चौदा लोकांच्या चमूने आपत्ती काळात काय उपाययोजना कराव्यात याचे प्रशिक्षण दिले. तसेच प्रात्यक्षिकही करून दाखवले. यामध्ये पुराच्या पाण्यातून कसा बचाव करावा, अपघात झाल्यास रक्तप्रवाह कसा थांबवावा, झाड पडल्यास काय उपाययोजना कराव्या, आग लागल्यास सर्वात प्रथम काय करावे, लहान मुले पाण्यात पडल्यास कसे वाचवावे याबाबत एनडीआरएफचे प्रशिक्षक योगेश शर्मा यांनी व त्यांच्या टीमने प्रात्यक्षिक करून दाखवले.

यावेळी जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांच्या नेतृत्वात तहसीलदार समाधान सोनवणे, तहसीलदार अतुल पाटोळे, तहसीलदार शीतल सोलाट, तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण पार पडले.

बातम्या आणखी आहेत...