आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकल्पात शंभर टक्के जलसाठा:राजूरा, गोडाडा, धानोरा प्रकल्पातून विसर्ग सुरु; पाण्याचा प्रश्न निकाली

खामगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव जामोद तालुक्‍यातील राजुरा व गोडाडा हे दोन प्रकल्प २१ जुलै रोजी तर धानोरा प्रकल्प २५ जुलै, खामगाव तालुक्‍यातील मस प्रकल्प हा १ ऑगस्ट रोजी १०० टक्के भरले आहे. या चारही प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. हे प्रकल्प भरल्यामुळे या प्रकल्पातून ज्या-ज्या गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. त्या-त्या गावातील लोकांचा पाण्याचा प्रश्‍न आज रोजी निकाली निघाला असून सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांना रब्बीचे उत्पादन घेता येणार आहे.पाटबंधारे उपविभाग खामगाव अंतर्गत तालुक्यात ज्ञानगंगा,मस, लांजुड व ढोरपगाव आणि जळगाव जामोद तालुक्‍यातील धानोरा, राजुरा व गोडाडा हे प्रकल्प येतात. यंदाच्या पावसाळ्यातील तीन महिन्याच्या काळात धानोरा, राजुरा, गाडोडा व मस या प्रकल्प क्षेत्रात धुवाधार पाऊस बरसल्याने हे प्रकल्प पाण्याने तुडुंब भरले आहे.

बातम्या आणखी आहेत...