आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामसभा:दाभा येथील ग्रामसभेत विविध प्रश्नांवर चर्चा ; तरुणांनी उपस्थित केले अनेक प्रश्न

लोणार24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील दाभा येथे नुकतीच ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. गावातील तरुणांनी ग्रामसभेत अनेक प्रश्न उपस्थित केल्याने त्यांनी लेखी स्वरूपात सादर करावे, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. त्यामुळे सदर प्रश्नावर रितसर चर्चा करून निकाली काढण्यात येतील असे आश्वासन सरपंच व ग्रामसेवकांनी दिले.

ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत सर्वांनी पाणीकर १०० टक्के भरणा करावा, संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवावे. ग्रामीण रोजगार हमी कृती आराखडा तयार करून लेबर बजेटला मंजुरी द्यावी. बालविवाह प्रतिबंध, विधवा महिलांना सन्मान पूर्वक वागणूक देणे, तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडी करणे यासह आदी विषयावर ग्रामसभेत चर्चा करण्यात आली. दरम्यान, तंटामुक्ती अध्यक्षासाठी राजू डव्हळे, अशोक बोखारे, अशोक बाजड यांनी आपली दावेदारी सांगितली. त्यामुळे तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांची निवड करण्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती सरपंच वर्षा किशोर मोरे यांनी दिली. ग्रामसभेतील विषय पटलावरील एक ते सहा विषय पूर्ण करत सणासुदीच्या दिवसांमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक किशोर भाग्यवंत व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...