आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधनादेश अनादर प्रकरणी नलिनी छगन दाभाडकर यांना नुकसान भरपाई म्हणून ४ लाख ६८ हजार ७९४ रूपये देण्याचे तसेच रक्कम न दिल्यास, सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ३ डिसेंबर रोजी प्रथम वर्ग न्यायाधिश एस. ए. कुलकर्णी यांनी सुनावली.
तक्रारकर्ते व्ही. आर. ट्रेडर्सचे मालक राजेश संजय भागवत हे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे परवानाधारक अडते आहेत. आरोपी नलिनी छगन दाभाडकर या ‘गुरुदत्त ट्रेडर्स’च्या मालक आहे. आरोपी ही कृषी उत्पन्न बाजार समितीची व्यापारी असून तिने तक्रारकर्त्याच्या अडत मधून ३ मे २०१७ व ६ मे २०१७ रोजी उधारीवर माल खरेदी केला होता व त्याच्या परतफेडीपोटी मलकापूर अर्बन बँकेचे दोन चेक तक्रारदारास दिले होते.
ते दोन्ही चेक अनादरीत झाल्यामुळे तक्रारकर्त्यांने आरोपीस त्याचे वकिलामार्फत नोटीस देऊन रुपये ३ लाख १८ हजार ३६६ रुपये एवढ्या रकमेची मागणी नोटीस मिळाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत देण्याची मागणी केली होती. परंतू ही नोटीस मिळून देखील आरोपीने तक्रारकर्त्यांस चेकची रक्कम दिली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्यांने आरोपीविरुद्ध येथील न्यायालयात प्रकरण दाखल केले.
यावेळी न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून व तक्रारकर्त्याच्या वतीने अॅड. जी. डी. पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस दोषी ठरवून धनादेशाच्या रकमेवर दरसाल दर शेकडा ९ टक्के दराने व्याज देण्याची आदेश दिले. तसेच आरोपीस ४ लाख ६८ हजार ७९४ रुपये एवढा दंड ठोठावला. तसेच ही रक्कम नुकसान भरपाई म्हणून तक्रारकर्त्यांस देण्याचे आरोपीस आदेश दिले. रक्कम न दिल्यास ६ महिन्यांची कारावासाची शिक्षा सुनावली.तक्रारकर्त्याच्या वतीने अॅड. जी. डी. पाटील यांनी काम पाहिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.