आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभाग रचना:जि. प. प्रभाग रचनांच्या तपासणीसाठी निवडणूक विभागाचे कामकाज सुरू; जून अखेर प्रभाग रचनांवर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद पाठोपाठ जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला आहे. यामुळे आजपासून प्रारूप रचनेचे काम युद्धस्तरावर हाती घेण्यात आले आहे. यासाठी तेरा तहसीलचे कर्मचारी निवडणूक विभागात कामाला भिडल्याचे दिसून आले. जून अखेर प्रभाग रचनांवर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.

आयोगाच्या नवीन आदेशानुसार जिल्हाधिकारी यांना २३ मे पर्यंत रचनेचे प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करावे लागणार आहे . ३१ मे पर्यंत आयुक्त याला मान्यता देणार असून २ जूनला जिल्हाधिकारी याला प्रसिद्ध करणार आहे. या रचनांवर जिल्हाधिकारी यांच्याकडे २ ते ८ जून दरम्यान हरकती व सूचना सादर करता येतील. सुनावणी अंती विभागीय आयुक्त जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण २२ जून पर्यंत अंतिम करतील. २७ ला अंतिम प्रभाग रचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल.

हा व्यस्त कार्यक्रम लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभाग व १३ तहसील मधील निवडणूक कक्षाचे कर्मचारी आजपासून कामाला भिडल्याचे चित्र आहे. स्थानिक निवडणूक विभागात आज शुक्रवारी सकाळ पासून ६८ जिल्हा परिषद गट आणि १३६ पंचायत गणांच्या प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी, पडताळणी करण्याचे कामास प्रारंभ झाला आहे. आरडीसी दिनेश गीते, उपजिल्हाधिकारी ( निवडणूक) गौरी सावंत, नायब तहसीलदार सुनील आहेर, एके राम जाधव यांच्या मार्गदर्शनात ही तपासणी करण्यात येत असून संभाव्य त्रुटी शोधण्याचे काम करण्यात येत आहे. या पडताळणी अंती जिल्हाधिकारी २३मे पर्यंत रचनेचे प्रस्ताव मान्यतेसाठी विभागीय आयुक्तांकडे सादर करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...