आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा बंगला सध्या घोड्यांचा तबेला बनला आहे. बंगल्याची तोडफोड करण्यात आली असून, त्याचे दरवाजे व खिडक्याही गायब झाल्या आहेत. बंगल्याच्या परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याच बाजूला असलेल्या कृषी विभागाच्या गोदामाची अवस्थाही अशीच वाईट झाले आहे. याच्याही खिडक्या तोडलेल्या दिसत आहे. त्यामुळे येथील खिडक्या दरवाजे चोरीस जात आहे की काय, अशी शंका व्यक्त होत आहे. मात्र चोरीला जाण्याची कोणतीही तक्रार पोलिस स्टेशनला नाही.
ग्रामीण भागाच्या विकासाशी नाळ जोडलेल्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे कामकाज चालते. अनेक लोकोपयोगी कामे त्यांनी घेतलेल्या ठरावाच्या निर्णयानंतर मार्गी लागतात. बहुतांश निधी जिल्हा वार्षीक योजनेतून जिल्हा परिषदेला दिले जातो. अशा विकासात्मक घडामोडीला आयाम देणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षाच्या बंगल्याचीच आता मोडतोड झाली असून तेथील बहुतांश सामान चोरीस गेले आहे.
दरवाजे, खिडक्या या ठिकाणी दिसत नाहीत. शासकीय नळही चोवीस तास सुरु असून त्याचा उपयोग घोड्यांना स्नान घालणे, याच ठिकाणी बालकांनाही अंघोळीची मजा मिळणे, बाहेरच बग्गी उभी करणे अन् हे सर्व करत असताना त्या परिसरात पाणी साचून डबके तयार होण्याचे प्रकार सध्या घडत आहेत. उपाध्यक्षांच्या बंगल्यासमोर घोड्यांचा तबेला बनवला आहे. तेथेही घाणीच साम्राज्य पसरले आहे.
अध्यक्षांच्या बंगल्याला लागूनच कृषी विभागाचे गोदाम आहे. त्याच्या खिडक्याही तुटलेल्या असून लाकडे ही गायब आहेत. आत मात्र कृषी साहित्याऐवजी दुसरेच सामान गोदामात दिसत आहे. अशी ही अवस्था जिल्हा परिषदेसारख्या मिनी मंत्रालयाच्या प्रमुखांच्या बंगल्याची झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी लक्ष देणारे कोणीच नसल्याने हे सर्व फावत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.