आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:डोणगाव- मेहकर महामार्गाची दूरवस्था; आक्रोश आंदोलनातून शासनाचा निषेध

मेहकरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डोणगाव-मेहकर महामार्गाची दुरावस्था झालेली आहे. यामुळे निरपराधांचा बळी गेला आहे. अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. रस्ता दुरूस्तीसाठी ठोस निर्णय न झाल्याने डोणगावातील छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन व जनसामान्यांच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष अमोल धोटे यांच्या मार्गदर्शनात डोणगाव येथे रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांची फुलदीप धुपाने महापूजा केली.

लोणार मेहकरचे आ. संजय रायमूलकर यांनी आंदोलनकर्त्यांशी दूरध्वनीच्या माध्यमातून संवाद साधला. आंदोलनकर्त्यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत खंत व्यक्त केली. रस्त्याचे काम हे आजच सुरु करू असे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलनाला स्थगिती देऊन आंदोलन थांबवण्यात आले. जर महामार्गाचे काम सुरु केले नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष अमोल धोटे यांनी दिला.

या आंदोलनात छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशनचे अध्यक्ष पवन वाणी, उपाध्यक्ष माधव बोरकर, सचिव विकास खोरणे, नीलेश सदावर्ते, विकी दिनोरे, अविनाश खोडके, रामू पांडव, आसिफ खान, राम आनकर, विजय गोरे, अशोक काळे, रवी काळे जुबेर, प्रकाश पैठणकर, पप्पू रुपेश खोरणे, विठ्ठल शेजुळ, शुभम पवार, आकाश खोरणे, गजानन निंबाळकर, राहुल जाधव, राम कावले, आरिफ बागवान, आसिफ खान, नागेश वाणी, शेख आसिफ सादिक पठाण, गजानन गोरे, रामरतन धोटे, प्रीतम भारस्कर, नागेश जमदाडे, भागवत आखाडे आदींसह ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता.

बातम्या आणखी आहेत...