आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:आम्रपाली बुद्ध विहारात 111 बुद्ध मूर्तींचे वाटप ; गगन मलिक फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित

शेगाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील आम्रपाली बुद्ध विहारात गगन मलिक फाउंडेशन व गगन मलिक इंडिया तसेच आम्रपाली बुद्ध विहार समितीच्या वतीने १११ बुद्ध मूर्ती वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला व्हिएतनाम येथील तीस ते पस्तीस मान्यवर, तसेच गगन मलिक फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुद्ध विहार तथा आम्रपाली गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र शेगावकर हे होते. तर मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष सी. एम. थुल, सिद्धार्थ आंबेरे, भदंत बी संघपाल महाथेरो चैत्यभूमी दादर, मुख्याधिकारी जयश्री बोराडे, समाजभूषण नितीन शेगोकार, नितीन गजभिये, दिनेश शेंडे, खोब्रागडे, प्रवीण कांबळे यांची उपस्थिती होती. या वेळी गगन फाउंडेशनचे गगन मलिक यांनी शहरात किंवा ग्रामीण भागात गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहकार्य करण्यात येईल. तसेच विदेशात नोकरीसाठी शिफारस करण्यात येईल, त्या सोबत गावागावात बुद्ध विहारासाठी बुद्ध मूर्तीचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे उपासकांनी गगन फाउंडेशनचे सदस्य व्हावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाला एच. डी. अजने, व्ही. एस. गवई, संजय साबळे, सिद्धार्थ गवई, बी. डी. शिरसाट, आय. एम. गवई, टी. एम. तायडे, पी. डी. शेगोकार, शिक्षक समदूर, मनोज शेगोकार, बलवंत शेगावकर, गौतम सुरवाडे, नगराळे, वाडेकर तसेच आम्रपाली बुद्धिवाद समितीचे सभासद उपासक व उपासिकांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...