आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील मानकुंवरबेन लालचंद दोशी सार्वजनिक छास केंद्रातर्फे ३ एप्रिल ते ४ जून या दोन महिन्याच्या कालावधीत नोंदणी केलेल्या सुमारे पाच हजार नागरिकांना एकूण ६० हजार लिटर ताकाचे मोफत वितरण करण्यात आले. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये मोफत ताक वितरणाचे कार्य करणारे या केंद्रामार्फत करण्यात येते हे विशेष!
गर्मीना दिवसोना ज्या गरम लू ना वायरा बहेता होय, ज्या पाणी माटे मानव तरसतो हयो ऐका समय अमृततुल्य छास वहेची गरीबोनी सेवा करवामाथी आत्माशांती मिळसे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सार्वजनिक छास केंद्रातर्फे १९६७ पासून कोरोना काळातील दोन वर्ष वगळता हे कार्य अखंडितपणे ४४ वर्षांपासून सुरु आहे. या कार्यात अकोल्यातील रोहित दोशी यांचे पुत्र कपिल व राजू यांचे दरवर्षी योगदान लाभते. यंदा माेफत ताक वितरणाचा शुभारंभ ३ एप्रिलला करण्यात आला.
पहिल्याच दिवशी पाच हजार लोकांना ताकाचे वितरण करण्यात आले. ताक मिळवण्यासाठी शहरातील केशवनगर, दालफैल, सतीफैल, शंकर नगर, गोरक्षण रोड आदी भागातील लोकांना रोज ताकाचे वितरण करण्यात आले. १५० लिटर दुधाचे दही बनवून त्यापासून ९०० लिटर ताक रोज वितरीत करण्यात आले. सकाळी पाचेपासूनच हसमुख कमाणी, कीर्ती खिलोशीया, सुनील माने हे ताक बनवण्यास सुरुवात करायचे. शिधा पत्रिकेतील एका व्यक्तीला एक पाव याप्रमाणे ताकाचे वितरण करण्यात आले. यासाठी महेंद्र शाह, हसमुख कमाणी, भिकू संघराजका, पिनेश कमाणी, कपिल दोशी, कीर्तिकुमार खिलोशिया, अॅड. देशमुख, डॉ. लक्ष्मीचंद बोरा हे वितरणाचे काम बघत असल्याची माहिती छास केंद्राचे अध्यक्ष महेंद्र अमृतलाल शाह यांनी दिली.
सार्वजनिक छास केंद्र अविरतपणे चालू ठेवण्याचा मानस
शहरवासीयांना उन्हाळ्यात मोफत ताकाचे वितरण करण्यात येते. यावेळी ३ लाख ८० हजार रुपये ताकासाठी खर्च आला. हे कार्य अविरतपणे चालू ठेवण्याचा आमचा मानस आहे. या सार्वजनिक छास केंद्राच्या पदाधिकाऱ्यांपैकी कोणीही येथून ताक घरी नेत नाही.
- महेंद्र अमृतलाल शाह, अध्यक्ष, श्रीमती मानकुंबरबेन लालचंद दोशी सार्वजनिक छास केंद्र, खामगाव.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.