आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक गुणवत्ता:सावित्रीच्या लेकींना सायकलींचे वाटप ; मानव विकास मिशन अंतर्गत उपक्रम

मेहकरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील डोणगाव येथून जवळच असलेल्या ग्राम लोणीगवळी येथील बाबुराव पाटील विद्यालय येथे मानव विकास मिशन अंतर्गत होतकरू विद्यार्थ्यांची शाळेमधील उपस्थितीसह शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी सायकलीचे २९ ऑगस्ट रोजी मोफत वाटप करण्यात आले.

देशभक्त हि. सो. उर्फ बाबुराव पाटील विद्यालय लोणीगवळी येथे मानव विकास मिशन अंतर्गत सावित्रीच्या लेकींना १७ सायकलचे वाटप सोमवार रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष भास्करराव पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक संपतराव देशमुख, प्रशांत पाटील, सखाराम काळदाते उपस्थित होते. दरम्यान शाळेचे मुख्याध्यापक सुरेश हिवरकर यांनी मुलींना मोफत सायकल वाटप केल्याने शाळेत यायला सोयीस्कर होईल. त्याचबरोबर शाळेतील उपस्थितीमुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास निश्चित मदत होणार असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी संस्थाध्यक्ष भास्करराव पाटील यांनी शाळेत केलेली वृक्ष लागवड व बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे पाहुन समाधान व्यक्त केले.दरम्यान वर्ग ८ ते १२ च्या मुलींना संस्थाध्यक्ष भास्कर पाटील यांनी सायकल वाटप करून मुलींना पुष्पगुच्छ देऊन शैक्षणिक प्रगती करण्याचे आवाहन केले. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक चव्हाण यांनी तर आभार पाचपोर यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...