आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासहयोग फाउंडेशन व नारिशक्ती जागृती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मालेगाव तालुक्यातील बिबे फोडणाऱ्या महिलांच्या घरी जाऊन मास्क व ग्लोजचे वितरण करण्यात आले. हा सामाजिक उपक्रम फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष प्रा. संगीता इंगोले यांच्या पुढाकारातून राबवण्यात आला. यावेळी डॉ. नीलिमा चव्हाण, सोनाली गर्जे, डॉ. अर्चना डाळे, पूनम लढ्ढा, अमरजीत कौर, अनुपमा मानधणे, श्वेता बडजात्या आदींची उपस्थिती होती. मालेगाव तालुक्यातील अमानी येथील बहुतांश महिला गोडंबी बनवण्यासाठी बिबे फोडण्याचे काम करतात. या कामामुळे त्यांच्या हाताला आणि चेहऱ्याला जखमा होतात. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासत प्रा. संगीता इंगोले यांनी बिबे फोडणाऱ्या महिलांना कापडी रुमाल, मास्क व ग्लोजचे वितरण केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.