आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाप्रसादाचे वितरण:संत नागेश्वर महाराज पुण्यतिथीनिमित्त महाप्रसादाचे वितरण; दिंड्यांची रेलचेल

संग्रामपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ५७ क्विंटल भाकरी, ५ क्विंटल उडदाची डाळ, ५ क्विंटल शिऱ्याचा भंडारा

परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे रविवार, ३ एप्रिल रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री संत नागेश्वर महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी हजारो भाविकांना भाकरी, उडदाचे वरण व शिरा असा महाप्रसाद वाटप करण्यात आला. या उत्सवामुळे गावात मंगलमय वातावरण होते तर एकाही घरी चूल पेटली नाही.

संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील सातपुड्याच्या पायथ्याशी सातलवन नदी परिसरातील निसर्गरम्य वातावरणात श्री संत नागेश्वर महाराज यांचे नक्षीकाम केलेले भव्य असे मंदिर आहे. गुढी पाडव्याच्या शुभ पर्वावर नागेश्वर महाराजांची पुण्यतिथी व दुसऱ्या दिवशी यात्रौत्सव साजरा करण्यात येतो. मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे यात्रोत्सव रद्द करण्यात आला होता. परंतु यंदा ग्रामस्थ व भाविकांच्या वतीने पुण्यतिथी व यात्रौत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला.

पुण्यतिथी निमित्त महाराजांचे दर्शन घेण्यासाठी पंचकोशीतील भाविकांनी एकच गर्दी केली होती. यंदा भाविकांसाठी ३५ क्विंटल ज्वारीच्या भाकरी, ५ क्विंटल उडदाची डाळ, पाच क्विंटल साहित्याचा शिरा व अंबाडीची भाजीचा भंडारा आयोजित करण्यात आला होता. गावातील सर्व जाती-धर्माच्या महिलांना ज्वारीचे पीठ देऊन भाकरी तयार करण्यात आल्या व त्या भाकरी ट्रॅक्टर द्वारे जमा करून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. विशेष आजच्या दिवशी गावातील एकाही घरात चूल पेटत नाही.

यावेळी गावाच्या प्रमुख मार्गावरुन भजनी मंडळाची मिरवणूक काढण्यात आली. उत्सवानिमित्त गावातील प्रत्येक महिलांनी आपल्या घरासमोर सडा सारवण करून रांगोळी काढली होती. तत्पूर्वी श्री नागेश्वर महाराजांच्या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भजनी मंडळासह हजारो भाविक सहभागी झाले होते. बेटी बचाव बेटी पढाव, स्वच्छता अभियान आदी जनजागृती करीत संपूर्ण गावातील नागरिकांनी नागेश्वर महाराज यांच्या पालखीची मिरवणूक काढली.

यावेळी जि. प. चे माजी उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ, संतोष रायपूरे, काँग्रेसच्या पक्षनेत्या डॉ. स्वाती वाकेकर, जि. प. सदस्या मीनाक्षी हागे, बाळू कुटे, दत्ता पाटील, तुकाराम काळपांडे, राजेंद्र वानखडे, संजय मारोडे, प्रकाश ढोकने, भुरजे, दुर्गासिंग सोळंके यांनी भेटी देऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. गावातील नागेश्वर महाराज सांस्थानचे, विश्वस्त, सरपंच, उपसरपंच, सदस्य, वरवट बकाल गावातील अनेक नागरिकांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...