आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासहकार व पणन खात्याने सहकारी बँका, साखर कारखान्यांसह इतर क्षेत्रातील निवडणुकीला १५ जुलै २०२२ रोजी स्थगिती दिली होती. ही स्थगिती ३० सप्टेंबरपर्यंत होती. याबाबतचा औरंगाबाद खंडपीठातील स्थगन आदेश राज्य शासनाने मागे घेतल्याने सहकारी क्षेत्रातील निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता जिल्हा केंद्रीय बँकेची निवडणूकही लागू शकते.
त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली ही निवडणुकीसाठी इच्छुकांना दिलासा मिळाला आहे. बुलडाणा जिल्हा केंद्रीय बँकेची निवडणूक लागण्यासाठी ग्राम सोसायट्या होणे महत्वाच्या आहे. सध्या ६१ सोसायट्यांच्या निवडणुका बाकी आहेत. त्यातील काही निवडणुका लागल्या असून काहींची मुदत मार्च महिन्यानंतर संपणार आहे.
ग्रामसेवा सोसायट्यांमुळे अडली होती निवडणूक
जिल्ह्यात ५६७ ग्रामसेवा सोसायट्या आहेत. त्यापैकी ५५५ ग्रामसेवा सोसायट्या निवडणुकीसाठी पात्र होत्या. यातील ४९४ ग्राम सेवा सोसायट्यांची निवडणूक पूर्ण झाली असून ६१ ग्रामसेवा सोसायट्यांची निवडणुक होणे बाकी आहे. यातील काही ग्रामसोसायटींची निवडणूक मार्च २०२३ पर्यंत होऊ शकते. परंतु, याच ग्राम सेवा सोसायट्यांमुळे जिल्हा केंद्रीय बँकेच्या निवडणुकीचा मार्ग कठीण होता. तो आता सुकर झाला आहे.
निवडणुकीवरील स्थगिती उठवल्याची माहिती नाही
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार ग्रामसेवा सोसायट्यांच्या निवडणुका सुरु आहेत. पुरेशा ग्रामसेवा सोसायट्या असल्याने निवडणुका लागू शकतात. पण अवधी अजून सांगू शकत नाही. जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोक राऊत यांनी सांगितले, अजून दहा टक्के ग्रामसेवा सोसायट्यांची निवडणूक बाकी आहे. मात्र सहकार क्षेत्रातील बँकांची स्थगिती उठवल्याची माहिती अजून काही मिळाली नाही. निवडणुकीबाबत ठोस माहिती नाही.
बँकेचे ४७७४ भागधारक
जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे भागधारकांची संख्याही ४७७४ इतके आहेत. यामध्ये सहकारी संस्था१३८८ इतकी आहेत. वैयक्तीक सभासद ३३८२ आहे. राज्य सहकारी बँक ही एक सभासद आहे. तीन साखर कारखाने सभासद आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत एवढे सभासद मतदानासाठी असू शकतात किंवा सभासदांमध्ये वाढही होऊ शकते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.