आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त शासन, कृषि विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा विभागाच्या वतीने जिजामाता प्रेक्षागार येथे १० ते १४ फेब्रुवारी पर्यंत जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू शरद गडाख, आमदार ॲड. किरण सरनाईक, वसंत खंडेलवाल, आ.धीरज लिंगाडे, राजेंद्र शिंगणे, डॉ. संजय कुटे, संजय रायमुलकर, ॲड. आकाश फुंडकर, संजय गायकवाड, श्वेता महाले, राजेश एकडे, जिल्हाधिकारी डॉ. ह. पी. तुम्मोड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड, विभागीय कृषि सहसंचालक किसन मुळे उपस्थित राहणार आहेत. कृषी विद्यापीठाच्या वतीने संशोधन आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेत जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रब्बीचा हंगाम उत्तरार्धात आल्यानंतर शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान पाहण्यासाठी वेळ मिळतो.
त्यामुळे या कृषी महोत्सवाबद्दल शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता असते. महोत्सवातील प्रात्यक्षिकांमध्ये राज्य तसेच जिल्ह्यातील विविध प्रयोग सादर करण्यात येणार आहेत. त्यामध्ये उत्पादनक्षम शेती, एकात्मिक पीक व्यवस्थापन एकात्मिक कीटक व्यवस्थापन, एकात्मिक शेती व्यवस्थापन, सेंद्रिय आणि रासायनिक शेतीची प्रात्यक्षिके विद्यापीठाकडून सादर केली जाणार आहेत. तसेच कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबियांच्या व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट बाबतचे संशोधन, नवीन वाणाचे संशोधन, बदलेले वातावरण, पर्जन्य आणि उष्णता बदलाचा वेध घेऊन करण्यात येत असलेल्या संशोधनाचे सादरीकरण या महोत्सवात करण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.